Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*सार्वजनिक ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री; पोलिसांनी टाकला छापा*

 

बेळगाव : बेकायदेशीर हातभट्टी दारूच्या विक्रीविरोधात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे. मच्छे गावाच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी छापा टाकून सुमारे 20 लिटर दारू जप्त केली.

ही कारवाई 4 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आली. या प्रकरणात परशुराम बसप्पा नाईक (वय 35, रा. वाल्मिकी नगर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना आरोपी सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोदकुमार सरनाईक आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

कारवाईदरम्यान आरोपीकडून एकूण 20 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 206/2026 नोंदविण्यात आला असून कर्नाटक अबकारी अधिनियम, 1965 मधील कलम 32 आणि 34 अंतर्गत आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा**कपिलेश्वर तलावात विसर्जनासाठी पाणीच नाही; महापालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप**बल्लारी चलो’मध्ये बेळगावचा भाजपचा जोरदार सहभाग; हजाराहून अधिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी**सार्वजनिक ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री; पोलिसांनी टाकला छापा**बेळगाव सीसीबीची मोठी कारवाई; गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक, 1.80 लाखांचा मुद्देमाल जप्त**नव कर्नाटक शेतकरी संघटनेच्या बेळगाव जिल्हा महिला आघाडीची घोषणा; लता अनस्कर जिल्हाध्यक्षा**गणेशोत्सवात गोंधळ घातल्यास कारवाई अटळ; बेळगावात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड**रुद्राक्ष वृक्षाच्या सान्निध्यात शिवगिरी मंदिरात महारुद्राभिषेक; २८ वर्षांच्या धार्मिक-सामाजिक प्रवासाचा विशेष सोहळा**राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सोडून भाजपकडून राजकारण; लक्ष्मी हेब्बाळकरांचा आरोप**बनशंकरी मंदिरात वरमहालक्ष्मी पूजेनिमित्त हळदी-कुंकू व ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात*