LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Education News

*मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार*


 आज शनिवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी शाळेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात सर्व एस्.डी.एम्.सी.सदस्याच्या वतीने आदर्श शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर एस्.डी.एम्.सी.उपाध्यक्ष श्री जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी आपल्या विचारांतून निलजकर टिचरांनी शाळेच्या सुधारणा करण्यासाठी जी उत्तम कार्य करत त्यांनी आदर्श शाळा बनवण्यासाठी आपले फार योगदान दिले आहे आणि हे करत त्यांनी गेली चार वर्षे शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून एक उत्तम सेवा केली त्याची पोच पावती ही कर्नाटक सरकारने त्यांना पुरस्कार देऊन केली आहे असे कौतुक करत त्यांचे अभिनंदन व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या यांनतर या सत्कारला प्रतिउत्तर विचार सत्कारमुर्ती सौ. शोभा राजाराम निलजकर यांनी जो पुरस्कार मिळाला हा स्वतः ला नाहीतर माझ्या शाळेला मिळालेला आहे हा पुरस्कार मिळण्यासाठी जे कार्य केले ते मी एकटीने नकरता मला आजपर्यंतच्या शाळेच्या आजी माजी सर्व एस.डी.एम.सी. नी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी,सर्व शिक्षकांनी मला साथ दिली या मुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले आणि शाळेमध्ये वापरण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे याची दखल घेऊन शाळेमध्ये विहिर खुदाई करुन त्यामधील पाणी खेचण्यासाठी  मोटर, पाईप लाईन, सिंटेक्स टाकी याला येणाऱ्या खर्चासाठी म्हणून एक लाख एकवीस हजार ची देणगी जाहीर केली या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित शाळेच्या एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर,शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री राजेंद्र चलवादी,एस.डी.एम.सी.उपाध्यक्ष श्री.जोतिबा उडकेकर, सदस्य श्री. मुर्तिकुमार माने, श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. दिनेश लोहार, श्री. मारुती यळगुकर,सदस्या सौ. अर्चना देसाई, सौ.ज्योती पाटील, सौ.प्रियंका सांबरेकर,शाळेचे शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी होते

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या तीन विद्यार्थिनींची बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवड**आंदोलनापूर्वीच ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाआधी मोठी कारवाई**राजकीय रणनीती, निवडणूक सर्वेक्षण अन् डिजिटल प्रचार; बेळगावात ‘STRATAGEM Matrix’चे नवे कार्यालय सुरू**दुर्गामाता दौडीपूर्वीच शास्त्री नगरमधील रस्त्याची दुरवस्था; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर**Skyworld Aviation Academy मध्ये मॉकटेल प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी दाखवली सर्जनशीलता आणि आत्मविश्वास**नाना पाटेकरांना रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली; अजित औरवडकर यांची 8 तासांची कलासाधना**संकेश्वरजवळ भीषण अपघात! टिपरला केएसआरटीसी बसची धडक; चालकाचा मृत्यू, 12 प्रवासी गंभीर**विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धाला प्रारंभ**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव च्या स्केटिंग पटू ची चमकदार कामगिरी**मृणाल हेब्बाळकर यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली*