Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

“अपयशातूनच यशाचा मार्ग तयार होतो” – किरण कामटे यांचा विद्यार्थ्यांना संदेश

बेळगाव : राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या IAS अधिकारी किरण कामटे यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, सातत्य आणि जिज्ञासू वृत्तीच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या घडामोडींचे निरीक्षण करावे, प्रश्न विचारण्याची सवय लावावी आणि ज्ञानाच्या शोधात कायम राहावे, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धा परीक्षेतील स्वतःच्या संघर्षाचा अनुभव सांगताना “सहा प्रयत्नांनंतर IAS मध्ये यश मिळाले,” असे सांगत अपयशातूनच प्रेरणा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि समर्पणाची भावना महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालय परिसरातील स्वच्छता आणि निसर्गरम्य वातावरणाचेही त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या स्पर्धा परीक्षा आणि करिअरविषयक प्रश्नांनाही त्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.के.ई. संस्थेचे सदस्य भारत शानभाग उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयातील वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा स्टुडंट कौन्सिल विभागाचे चेअरमन डॉ. एस.एच. पाटील यांनी सादर केला.
यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कला शाखेतील कु. सक्षम जाधव यांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले, तर कु. अनुष्का जाधव हिला सर्वोत्कृष्ट प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनीचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बी.बी.ए. विभागातील कु. लक्षिता किशन जांगिड, वाणिज्य विभागातील चेतन अड्डांगी आणि विश्रांती नाईक तसेच कला विभागातील स्वाती गजानन पाटील यांचाही उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुनीत कक्कनगी आणि संपदा कणबरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शर्मिला संभाजी आणि प्रा. श्रुती सालगुडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. शरयू पोतनीस यांनी मानले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहनबेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारा