Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी

विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी

बेळगाव: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त चव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ संस्थेत भक्ती, परंपरा आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्माई पालखीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या आवारात पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा काढण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. भजन, कीर्तन आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्मिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा उपप्राचार्य एम. के. पाटील, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. पाटील, जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एल. बी. जाधव, महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारापावसाळा सुरू तरी चव्हाट गल्लीत पाण्याचा प्रश्न कायम, नागरिकांचा संतापकामत गल्लीतील आगग्रस्तांना आर्थिक सहाय्य; मृगेंद्रगौडा पाटील यांचा संवेदनशील पुढाकार*बेळगावात दोन अल्पवयीन दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात*