Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

रशियातून एमबीबीएस पदवी संपादन; डॉ. अनुजा उत्तम पाटील यांचा पाटील समाजातर्फे गौरव

रशियातून एमबीबीएस पदवी संपादन; डॉ. अनुजा उत्तम पाटील यांचा पाटील समाजातर्फे गौरव

बेळगाव | डी मीडिया

रशियातील कॅस्पियन विद्यापीठातून (Caspian University) एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या संपादन केल्याबद्दल डॉ. अनुजा उत्तम पाटील यांचा पाटील गल्ली येथे पाटील समाजाच्या वतीने सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

ज्येष्ठ नागरिक व्ही. डी. पाटील यांच्या नात असलेल्या डॉ. अनुजा पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कुटुंबासह परिसराचेही नाव उज्ज्वल केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोविंद बा. पाटील होते. यावेळी डॉ. अनुजा पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कुटुंबाच्या वतीने भाऊराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी सतीश पाटील यांनी डॉ. अनुजा पाटील यांना पुढील एम.डी. (MD) शिक्षणासाठी शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला दत्ताजी पाटील, रमेश पाटील, प्रदीप मेनसे, अनिल पाटील, निखिल पाटील, मुकेश पाटील, शुभम पाटील, अनिकेत पाटील, विनायक पाटील, सुरज पाटील, मधू पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह पाटील गल्लीतील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी दत्ताजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून समारंभाची सांगता केली.


 

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*