बेळगाव | डी मीडिया
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी.के. येथील स्वयंम अमर बसरीकट्टी हा विद्यार्थी शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजल्यानंतर शाळेतून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलाचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रयत्न सुरू असून, परिसरातही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित मुलगा कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने अमर बसरीकट्टी (मसनाई गल्ली) किंवा मसनाई युवक मंडळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : 9535456921
नागरिकांनी कोणतीही माहिती लपवून न ठेवता त्वरित कळविल्यास मुलाचा शोध लावण्यास मोठी मदत होऊ शकते, असे कुटुंबीयांनी नमूद केले आहे.
