बेळगाव ता, 9. विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्यक्षेत्र पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल अनगोळ, आयोजित 37व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धत उद्घाटनच्या दिवशी दक्षिण मध्यक्षेत्र,वेस्ट युपी,मध्यक्षेत्र उत्तरक्षेत्र या संघानी प्रतिस्पर्ध्याचा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला.
14 वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात दक्षिण मध्यक्षेत्रने उत्तर क्षेत्राचा 5-0 असा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात वेस्ट युपीने उत्तर क्षेत्राचा 2-0 असा पराभव केला, 17 वर्षाखालील गटात मध्य क्षेत्रने राजस्थानचा 1-0 असा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात उत्तर क्षेत्रने राजस्थानचा 2-0 पराभव केला तर तिसऱ्या सामना दक्षिणमध्यक्षेत्र व पूर्वोत्तर क्षेत्र लढत गोल 0-0 बरोबरीत राहिले 19 वर्षाखालील गटात वेस्ट युपीने उत्तर क्षेत्रचा 2-0 असा पराभव करीत विजय सलामी दिली.
अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून चेबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वप्निल शहा, मिस्टर इडिया इंडिया एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर, पूर्वोत्तरचे निरीक्षक सुबोध बोराह, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, राज्य क्रीडा प्रमुख देवेंद्रजी, अमरनाथ जी,विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ एस व्ही कुलकर्णी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी क्रीडा भरती राज्य सचिव अशोक शिंत्रे, कुंतूसागर, या मान्यवरांच्या हस्ते ओंकार सरस्वती भारत माता फोटो पूजन व दीप प्रज्वलन व फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. खेळाडू मेघा कलखाबकरने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले
याप्रसंगी प्रसाद कुलकर्णी रामनाथ नाईक, गोरखिंडी
मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील,अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार जयसिंग धनाजी, बापू देसाई,हर्ष रेडेकर, मानस नायकसह विविध क्षेत्राचे क्रीडाशिक्षक व आयोजन कमिटीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर तर सविता पाटणकर यांनी आभार मानले शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

