बेळगाव तारीख 7. विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्यक्षेत्र पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल अनगोळ, आयोजित 37व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला गुरुवार तारीख 8 पासून प्रारंभ होणार आहे.
प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील विद्याभारती फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्याचा मान अनगोळच्या संत मीरा शाळेला प्राप्त झाला आहे यंदा ही स्पर्धा 14, 17, व 19 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्र, मध्यक्षेत्र, वेस्ट युपी, ईस्ट युपी,पूर्वोत्तर, राजस्थान,उत्तर विभाग या, 7 क्षेत्रातील मुलींच्या संघाचे सघ सहभागी होणार आहेत.
सायंकाळी 5:30 वाजता अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ,चेबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वप्निल शहा, मिस्टर इडिया इंडिया एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर, पूर्वोत्तरचे निरीक्षक सुबोध बोराह, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, राज्य क्रीडा प्रमुख देवेंद्रजी, अमरनाथ जी,विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ एस व्ही कुलकर्णी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील,अनुराधा पुरी, शिवकुमार सुतारसह विविध क्षेत्राचे क्रीडाशिक्षक व आयोजन कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

