LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*मृणाल हेब्बाळकर यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली*

 

गोवा : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्गज कलाकार दिवंगत नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे आज गोव्यात सार्वजनिक दर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी बेळगावचे युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले असून, आपल्या दमदार अभिनयातून त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे, अशा भावना मृणाल हेब्बाळकर यांनी व्यक्त केल्या.

त्यानंतर त्यांनी नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर तसेच कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि दुःखाच्या प्रसंगी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, युरी आलेमाव, निशांत आनंद, अर्चित नाईक आणि वरदा मरासोलकर उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नाना पाटेकरांना रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली; अजित औरवडकर यांची 8 तासांची कलासाधना**संकेश्वरजवळ भीषण अपघात! टिपरला केएसआरटीसी बसची धडक; चालकाचा मृत्यू, 12 प्रवासी गंभीर**विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धाला प्रारंभ**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव च्या स्केटिंग पटू ची चमकदार कामगिरी**मृणाल हेब्बाळकर यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली**कर्नाटकात जिल्हा-तालुका पंचायत निवडणुकीची तयारी वेगवान; आरक्षणाची अधिसूचना जारी*नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा आजपासून*3 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन*बेळगावात भाजपची ‘सेवा ज्योती यात्रा’; पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेला उजाळा*