LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News | Crime News

*संकेश्वरजवळ भीषण अपघात! टिपरला केएसआरटीसी बसची धडक; चालकाचा मृत्यू, 12 प्रवासी गंभीर*

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यात संकेश्वरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर केएसआरटीसी बस आणि टिपर यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव बसने टिपरला मागून धडक दिल्याने बसचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगावती येथून बेळगावमार्गे कोल्हापूरकडे जाणारी ईशान्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस संकेश्वरजवळ आली असता हा अपघात घडला. बसने पुढे असलेल्या टिपरच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने बसचालक संगप्पा तळवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृत संगप्पा तळवार हे गदग जिल्ह्यातील रोण तालुक्यातील सावदी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

12 प्रवासी गंभीर जखमी

या अपघातात 12 प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने संकेश्वर येथील तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुंदा नगरी सज्ज* *बिर्ला शाळेच्या वतीने आयोजित** ज्योती सेंट्रल स्कूल ची अभिमानास्पद कामगिरी!गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचा बेळगावात सत्कार*देसूरच्या शाळेसाठी 5 एकर जमीन मिळवणार; ₹50 लाखांत ग्रंथालय उभारण्याची लक्ष्मी हेब्बाळकरांची घोषणा**बेळगावच्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेची’; अभय पाटलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर सतीश जारकीहोळींचा टोला**राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये समीक्षा कर्तस्करची दमदार कामगिरी; SGFI राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड**काकतीत थंडीमध्ये असहाय अवस्थेत आढळले आजोबा; समाजसेवकांच्या तत्परतेने जिल्हा रुग्णालयात दाखल बातमी**द. म. शीक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल च्या ध्यानेश संदीप बामणे याची बेळगाव च्या फुटबॉल जगतात उत्तुंग भरारी*🌟 नेतृत्व, सेवा आणि मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात! 🌟*बेळगावमध्ये 29 नोव्हेंबरला ‘हिंडाल्को नम्मा बेळगावी मॅरेथॉन’; 1000 धावपटूंचा सहभाग अपेक्षित*