बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स यांनी ओडिशा भुवनेश्वर येथे ओपन राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत व बंगलोर येथे झालेल्या सी बी एस ई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण 2 रौप्य व 2 कांस्य पदके जिंकून चमकदार कामगिरी केली या स्पर्धेमध्ये सुमारे 1200 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता
विजेते स्केटर्स खालीलप्रमाणे
सौरभ साळोखे 2 सुवर्ण
आर्या कदम 2 रौप्य
सिद्धार्थ पाटील 1 कांस्य
अवनीश कोरीशेट्टी 1 कांस्य
या सर्व स्केटर्स ना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर,विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत असून त्यांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असो चे सेक्रेटरी इंदुधर सीताराम व त्यांच्या आई वडिल यांचे प्रोत्साहन मिळत आहे

