LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*विभागीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा सेट झेवियर्स यांना विजेतेपद.*


 बेळगाव तारीख 12 चिंचणी रायबाग येथील रिव्हर साईड शाळेच्या मैदानावर चिकोडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात बेळगावच्या संघाने दुहेरी मुकुटसह विजेतेपद पटकाविले. आता वरील दोन्ही सण राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात संत मीरा बेळगावने हावेरीचा 5-0 असा पराभव केला विजयी संघाच्या आराध्या नाकाडीने 2 गोल,सकलेन मुल्ला, नेविन पत्की, समर्थ पनारे यांनी प्रत्येकी 1 गोल केले.उपांत्य सामन्यात बेळगावने धारवाडचा 4-0असा पराभव केला, विजयी संघाच्या सकलेन मुल्ला, रक्षित रामगौडा,नेवीन पत्की,आराध्या नाकाडी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

अंतिम सामन्यात बेळगावने बागलकोटचा पेनल्टी शूटआउटवर 3-1 असा पराभव करीत मागील पराभवाची परतफेड केली विजयी संघाच्या सकलेन मुल्ला  नेवीन पत्की, रक्षित रामगौडा यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

 मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यास सेंट झेवियस बेळगाव शहरने हावेरीचा 4-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या वेदिका कणबरकर व अपेक्षा मत्तीकोप यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अंतिम सामन्यात बेळगावने चिक्कोडीचा पेनल्टी शूटआउटवर 3-1 असा पराभव केला, विजयी संघाच्या प्रांजल हजेरी, तेजल हंजी, श्रद्धा पाटील यांनी प्रत्येकी 1 गोल केला, सेंट झेवियर शाळेच्या मारिया मुजावर हिने  सर्वोत्तम गोलरक्षणाची कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 वरील फुटबॉल संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, मानस नायक रविशंकर मालशेट,चेस्टर रोझारिओ, ज्युलेट फर्नांडिस अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल व जाहिदा पटेल यांनी संघाचे खास अभिनंदन केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*व्होट चोरी’विरोधातील दिल्लीतील आंदोलनात आमदार आसिफ (राजू) सेठ सहभागी**जमखंडी शुगर कारखान्यात २०० जणांच्या जमावाचा धुडगूस? अकाउंटंटच्या अपहरणाचा गंभीर आरोप**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे बैलहोंगल येथे २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण**मराठा लाईट इन्फंट्रीकडून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली; ‘प्रहार’मधील मेजर चव्हाण यांच्या भूमिकेच्या आठवणींना उजाळा**एसआयआरवरून भाजपचा काँग्रेस सरकारवर हल्लाबोल; अनिल बेनके यांची बंगळुरूत पत्रकार परिषद**ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे निधन; मराठी कला विश्वावर शोककळा**विभागीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा सेट झेवियर्स यांना विजेतेपद.**जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पार्किंग व्यवस्थेच्या विकासकामाचा शुभारंभ**चलवेनहट्टी येथील स्मशानभूमीत निवारा शेडच्या कार्याचे भुमी पुजन*नवरात्रीनिमित्त कंग्राळी बीकेमध्ये स्वच्छता मोहीम; कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटवर फुलांची सजावट करून दिला स्वच्छतेचा संदेश