LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*राज्यस्तरीय अॅथलेटिक्समध्ये मधुरी गजानन पाटीलची चमकदार कामगिरी*

तुमकुरू : राज्यस्तरीय ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत मधुरी गजानन पाटील हिने उल्लेखनीय कामगिरी करत अंडर-16 मुलींच्या 600 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले.

G B Lingadali Sports Foundation कडून मधुरीच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय पातळीवरील स्पर्धेत पदक मिळवत मधुरीने आपल्या मेहनतीची आणि क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप उमटवली आहे.

तुमकुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या State Level Junior Athletic Meet मध्ये विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये 600 मीटर धावण्याच्या अंडर-16 मुलींच्या गटात मधुरीने दमदार कामगिरी करत तिसरे स्थान मिळवले.

या यशामुळे मधुरीच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा असून, तिच्या कामगिरीचे क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

मधुरीच्या यशाबद्दल G B Lingadali Sports Foundation तसेच तिचे प्रशिक्षक, पालक आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तिने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*कुल्फी 'तर्फे घेण्यात आलेल्या 'लिहितं व्हा'स्पर्धेत सोमी पाटीलचे यश**शिक्षण, आरोग्यासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : लक्ष्मी हेब्बाळकर*मिरजच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी*राज्यस्तरीय अॅथलेटिक्समध्ये मधुरी गजानन पाटीलची चमकदार कामगिरी**१४ वर्षीय सुषांतची उपचारासाठी झुंज; कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीचे आवाहन GBS आजारामुळे हात-पायांवर परिणाम; बेळगावातील रुग्णालयात उपचार सुरू, २ ते ३ लाख रुपयांच्या खर्चाची गरज**बेळगाव शहर विकासाला गती देण्यासाठी बुडाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा**Skyworld Aviation Academyच्या विद्यार्थ्यांची हैदराबाद विमानतळावर निवड! बेळगावात सत्कार सोहळा; माजी आ संजय पाटील, नागराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती**अपघात प्रकरणात टेम्पो चालकासह मालकाची निर्दोष मुक्तता झाडशहापूर दर्ग्याजवळ मोटरसायकलला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूचा आरोप; साक्षीदारांच्या विसंगतीचा आरोपींना लाभ*कंग्राळी बी.के.मध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ट्रान्सफॉर्मरजवळ कचरा जाळल्याने ग्रामस्थ चिंतेत*कर्मचाऱ्यांच्या विम्यावर GST क्रेडिटचा मार्ग मोकळा होणार? 7 ऑक्टोबरच्या GST कौन्सिल बैठकीत प्रस्तावावर होणार चर्चा; कंपन्यांचा विमा खर्च कमी होण्याची शक्यता*