LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

अभिमानास्पद! निवृत्त सैनिक चंद्रकांत कडोलकर यांची पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांकाची कामगिरी

बेळगाव : विजेता स्पोर्ट्सचे मालक आणि निवृत्त सैनिक चंद्रकांत कडोलकर यांनी पुणे येथे आयोजित ‘Veterun – The Power of Grey’ हाफ मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ५५ ते ५९ वर्षे वयोगटातील २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन प्रकारात त्यांनी तृतीय क्रमांक मिळवून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील पाषाण येथील चव्हाणनगरमधील पुणे ग्रामीण पोलीस मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २१ किलोमीटर टाइम्ड रन, १० किलोमीटर टाइम्ड रन आणि ५ किलोमीटर फन रन अशा विविध प्रकारांचा समावेश होता.

चंद्रकांत कडोलकर यांनी वयाच्या ५५ ते ५९ वर्षे गटात २१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करत तिसरे स्थान पटकावले. त्यांच्या या कामगिरीतून शिस्त, सातत्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्दीचे दर्शन घडले आहे.

भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या चंद्रकांत कडोलकर यांनी निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्रातील आपली आवड जपली आहे. पुण्यातील या स्पर्धेतील त्यांचे यश हे वय हा केवळ आकडा असून, इच्छाशक्ती आणि नियमित सरावाच्या जोरावर कोणत्याही टप्प्यावर यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

त्यांच्या या यशामुळे क्रीडाप्रेमी आणि धावपटूंकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. बेळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

निवृत्तीनंतरही मैदान गाजवणाऱ्या चंद्रकांत कडोलकर यांचे हे यश नव्या पिढीतील धावपटूंना निश्चितच प्रेरणा देणारे आहे.

— D Media News | बेळगाव

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*मण्णिकेरी येथे प्रभुदेव मंदिराच्या कालम पूजा; मलागौडा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती**कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला बेळगावचा सलाम! ‘हमारा देश’ संघटनेतर्फे टिळकवाडीत बॅनर लावून गौरव*॥ विधायक उपक्रमांसह कै . आ. बी आय पाटील यांना श्रद्धांजली ॥*ऊस उत्पादकांना प्रतिटन ₹१,००० अतिरिक्त द्या! चन्नप्पा पुजारी यांची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा**माणुसकीचा आदर्श! बेळगावमध्ये अनोळखी व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार; सोशल रेस्क्यू टीमचा पुढाकार**दुःखाच्या प्रसंगातही सीमालढ्याची तळमळ कायम. रामराव राठोड यांची युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सांत्वनपर भेट*अभिमानास्पद! निवृत्त सैनिक चंद्रकांत कडोलकर यांची पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांकाची कामगिरी*कलैहोळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पुढाकार; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद**बेळगावमध्ये बेनन स्मिथ कॉलेजसमोर झाड कोसळले; पहाटेची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली!*बेळगाव एसआयआर प्रकरणाला वेग; डॉ. रवी पाटील यांना पोलिसांची नोटीस