बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी येथे तीन ते चार वर्षांपूर्वी नुतन स्मशानभूमी साठी जागा निश्चित करण्यात आली आणि सरकारी दप्तरी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियोजित जागेवर काही काळ अंत्यविधी करण्यात येत होते,पण निवारा शेड अभावी अग्नी देण्यास अडचणी निर्माण होत होत्या.दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीकडून मयताला अग्नि देण्यासाठी शेड व शेगडीची बांधणी नुकतीच झाली आहे.
या ठिकाणी अंत्यविधीला येणाऱ्या ग्रामस्थांना निवारा शेड नसल्याने मोठी गैरसोय होत होती स्मशानभूमी नवीन असल्याने वृक्ष देखील नसल्याने उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा बसत असे तसेच पावसाळ्यात भिजण्याची परीस्थिती अंत्यविधीला गेलेल्या ग्रामस्थांच्यावर ओढावत होती
गावातील कुणाला पाटील यांच्या आईचे निधन ऐन उन्हाळ्यात झाले. बाल्यावस्थेत असताना वडील गमावलेल्या कुणाल यांची आईचे निधन झाले आणि तो अगदी पोरका झाला. आपली आई गेली यांचे मोठे दुःख कुणालला झाले होतेच. ऐन उन्हाळ्यात अंत्यविधीला येणाऱ्या ग्रामस्थांना व नातेवाईकांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याची जाणीव देखील झाली.
आपले दुखवटा संपल्यानंतर लोकांची गैरसोय टाळावी यासाठी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ निवारा शेड बांधून देण्याची इच्छा व्यक्त केली, आणी सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने वीस फूट बाय तीस फुटांच्या शेडसाठी जागा निश्चित करण्यात आली आणी त्या शेडच्या कामाचे भूमी पुजन कुणाला यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले,यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोहर हुंदरे यांनी कुणाल यांचे आभार मानले तर यावेळी विठ्ठल कलखांबकर, लक्ष्मण बडवाण्णाचे, यल्लाप्पा हुंदरे, नारायण पाटील यल्लाप्पा कितवाडकर अमोल बडवाण्णाचे, किरण हुंदरे , युवराज पाटील, राजू हुंदरे मारुती आलगोंडी उमेश पाटील, गजानन बडवाण्णाचे

