बेळगाव : जिल्हा न्यायालयाच्या आवारातील वाहन पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने विकासकामाला सोमवार, दि. 12 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10.45 वाजता सुरुवात करण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मनjunाथ नायक आणि बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला बेळगाव बार असोसिएशनचे महासचिव सचिन आर. शिवण्णवर, उपाध्यक्ष पवन पाटील, व्यवस्थापन समितीच्या सदस्या दीपा हलप्पण्णवर, वसंत अक्केण्णवर यांच्यासह समितीचे इतर सदस्य, ज्येष्ठ व कनिष्ठ वकील उपस्थित होते.
जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पार्किंग व्यवस्थेच्या विकासामुळे वकील, पक्षकार आणि न्यायालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या विकासकामाच्या माध्यमातून पार्किंग परिसर अधिक व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, विकासकाम सुरू असलेल्या परिसरात वाहनांचे पार्किंग करू नये, असे आवाहन बेळगाव बार असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. विकासकाम सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी वकील तसेच न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनचे महासचिव सचिन आर. शिवण्णवर यांनी केले आहे.
D Media News | बेळगावच्या स्थानिक घडामोडींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.

