LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

मल्लेश चौगुले यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; राज्य संचालकपदी नियुक्ती

बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ दलित नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मल्लेश चौगुले यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (KPCC) SC विभागाच्या राज्य संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केपीसीसी SC विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार धर्मसेन यांनी जाहीर केली.
मल्लेश चौगुले यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने काम केले आहे. पक्षाच्या विविध निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका बजावत त्यांनी संघटन विस्तारासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस सेवा दल तसेच काँग्रेस SC-ST विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
सामाजिक क्षेत्रातही चौगुले यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. दलित समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत त्यांनी युवक आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मलेशिया येथील क्वालालंपूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय दलित साहित्य परिषदेत त्यांना 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक रत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता.
याशिवाय भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, कर्नाटक सरकारचा राज्य युवा पुरस्कार तसेच विविध सामाजिक संस्थांकडून अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत. सध्या ते अखिल भारतीय दलित युवा संघटना, नवी दिल्लीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून कर्नाटक सरकारच्या विविध शासकीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत.
काँग्रेस पक्षातील दीर्घकालीन योगदान, सामाजिक बांधिलकी आणि दलित चळवळीत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची राज्यस्तरीय पदावर नियुक्ती करण्यात आल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
देवस्थान संस्कृतीने जगाला आकर्षित केलेले भव्य राष्ट्र भारत : मनोहरजी मठदकर्नाटकातील विद्यार्थ्यांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू*गणेशोत्सव शांततेत साजरा करा; व्यापाऱ्यांना सकाळपर्यंत व्यवसायाची मुभा —आ अभय पाटील**सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेऊन त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्यभर जनस्पंदन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत**कंग्राळी बीकेतील बाल युवक गणेश मंडळाचा रौप्य महोत्सव; महाप्रसादाला भाविकांची**सरकारी सुविधा जनतेच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत : चन्नराज हत्तीहोळी उचगाव येथे ‘प्रजासेवा अभियान’; पात्र लाभार्थ्यांना विविध सुविधा व हक्कपत्रांचे वितरण**जायंटस सप्ताहाचा दिमाखदार शुभारंभ; व्हॉलीबॉल स्पर्धेने वाढविला उत्साह**तंजावर साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी रवींद्र पाटील यांचा सत्कार**कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत ‘क्रांतीज्योती लेखक- वाचक संघा’चे उद्घाटन*पतंगाच्या दोऱ्याचा घातक धोका! शहापुरात घार अडकली; स्थानिकांच्या सतर्कतेने वाचला जीव