LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*जायंटस सप्ताहाचा दिमाखदार शुभारंभ; व्हॉलीबॉल स्पर्धेने वाढविला उत्साह*

 

बेळगाव : जायंटस सप्ताहाचा शुभारंभ बालिका आदर्श विद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेला खेळाडू आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध डेव्हलपर व बिल्डर आर. एम. चौगुले आणि अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेच्या नेटचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी पूजा प्रवीण त्रिवेदी, फेडरेशन ऑफिसर डोणकरी, मुख्याध्यापक तसेच फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी मैदानावर दमदार खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह (मोमेंटो) आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, उपाध्यक्ष अरुण काळे, डायरेक्टर राहुल बेलवलकर, आकाश लाटूकर, जयवंत पाटील, प्रदीप चव्हाण आणि सचिव विश्वास पवार यांच्या हस्ते पार पडला.

जायंटस सप्ताहाची सुरुवात क्रीडा स्पर्धेने झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सप्ताहादरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*जायंटस सप्ताहाचा दिमाखदार शुभारंभ; व्हॉलीबॉल स्पर्धेने वाढविला उत्साह**तंजावर साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी रवींद्र पाटील यांचा सत्कार**कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत ‘क्रांतीज्योती लेखक- वाचक संघा’चे उद्घाटन*पतंगाच्या दोऱ्याचा घातक धोका! शहापुरात घार अडकली; स्थानिकांच्या सतर्कतेने वाचला जीवबेळगावात विश्वकर्मा जयंतीचा उत्साह; बाईक रॅलीसह भजन-कीर्तनाची मिरवणूक*विविध गावांतील गणेशोत्सव मंडळांना चन्नराज हट्टीहोळींची भेट; गणरायाकडे सुख-समृद्धीसाठी प्रार्थना**मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा; पकोडे-भाजी विकून काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन**ढोर गल्लीतील पीडित कुटुंबासाठी १० लाखांची मागणी : दलित नेते मल्लेश चौगुले**मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेळगावात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावची टीम सज्ज! आज यश ऑटो येथे शुभेच्छा कार्यक्रम*