Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Entertainment News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी *

दिनांक १४ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका शाहीन शेख उपस्थित होत्या. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दलितांचा कैवारी, माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा पुस्तकांच्या सहवासात राहणे महत्त्वाचे, दीन -दलितांच्या उध्दारासाठी जीवाचे रान करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन करणारे भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार, त्यांचे शिक्षण, त्यांचे कार्य प्रमुख पाहुण्या शाहीन शेख यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत व शिक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*माटोळी क्रॉसजवळ चित्त्याचा वावर; CCTV मध्ये हालचाली कैद, शेतकऱ्यांमध्ये भीती**रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा शाळेला क्रीडासाहित्य भेट**BEACON जिल्हा सदस्यत्व सेमिनार बेळगाव येथे यशस्वीपणे संपन्न**फुटबॉल स्पर्धेत संत मीरा जी जी चिटणीस शाळेला विजेतेपद**मोबाईल स्टेटसवरील फोटो ठरला वादाचा केंद्रबिंदू; कळ्ळोळीत तरुणाची हत्या, दोघे अटकेत*बेळगाव BUDAच्या अध्यक्षपदी आमदार आसिफ राजू सेठ; कर्नाटक सरकारचा आदेश जारी*बेळगावमध्ये शेळी चोरीचा पर्दाफाश; दोघे अटकेत, 7 शेळ्या-बोकडांसह कार जप्त*ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये २४ तास मद्यविक्री बंद; पोलीस आयुक्तांचा आदेशMaratha Mandal Polytechnicच्या विद्यार्थ्यांची नवकल्पनांना भरारी! *स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थ्याची भरारी; हर्षा सत्तिगेरी यांची Qatar Airways मध्ये निवड*