LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती*

 

शहापूर येथील सराफ गल्ली,बिचू गल्ली,आचार्य गल्ली,गाडेमार्ग,संभाजी रोड या परिसरात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक घगवे यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर काळ्या दिनाची जनजागृती करण्यात आली.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांनी गेल्या ७० वर्षांपासून अन्यायाने डांबण्यात आलेला हा मराठी बहुभाषिक प्रदेश महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी १९५६ साली शेकडो जणांनी आपले बलिदान दिले आणि ते हुतात्मे झाले. तरिही तत्कालीन केंद्र सरकारने आम्हाला अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली. याला विरोध म्हणून सीमाभागातील मराठी जनता हा दिवस काळादिन म्हणून सुतक पाळते, याही वर्षी आपण कुठेही कमी न पडता या मूक सायकल फेरीत बहुसंखेने उपस्थित राहूया व सायकल फेरी यशस्वी करूया असे आवाहन केले.

माजी नगरसेविका स्वाती संजय बैलूरकर यांनी या आपल्या भागातून मराठी भाषिकांवर झालेला अन्यायाच्या विरोधात व सिमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महिला नेहमीच अग्रेसर असून याही वेळी आपण महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहू, असे आश्वासन दिले.

अशोक घगवे यांनी तरुणांना आवाहन करताना १ नोव्हेंबर काळ्यादिनी बहुसंख्येने उपस्थित राहून केंद्र व कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकत दाखवून देऊया असे आवाहन केले.

सुरज जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानताना येथील उपस्थितांनी काळ्यादिनाची सायकल फेरी यशस्वी करण्यासाठी सराफ गल्ली,बीचू गल्ली,संभाजी रोड,गाडेमार्ग व आचार्य गल्ली येथे घरोघरी जाऊन जागृती करावी असे आव्हान केले.

यावेळी राजश्री बैलूरकर,प्रेमा माळवी,प्रतिभा माळवी,रेखा माळवी,शीतल माळवी,रेणुका सदावर, ऋतुजा मरुचे,दिपा माळवी,सविता माळवी,रोहिणी माळवी,ओंकार बैलूरकर,अमर कडगावकर,अमित डवरी,सौरभ पाटील,विशाल सावंत,अमित पाटील,साईराज कुगजी,रोशन पाटील,प्रणव माळवी,सुजल माळवी,उमेश पाटील,अभिषेक तरळे,निलेश काकतकर,ज्ञानेश्वर चिकोर्डे, गोविंद कुंडेकर,रघुनाथ माळवी,विजय पाटील,ओम बैलूरकर,श्रेयस सुरेडकर,विनायक मजुकर,प्रशांत बैलूरकर,अमर डवरी,प्रभाकर पाटील,अमित नाईक,विनायक पाटील,राजू डवरी,अनिकेत पाटील,राहुल माळवी,अभिषेक बैलूरकर,गजानन बैलूरकर, निखिल सुणगार,नागेश बैलूरकर आदी बहुसंख्य महिला व युवक उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*