LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*शिवांगी राहुल मोदगेकर यांना ‘बेला टिचर्स अवॉर्ड’ने सन्मानित*

बेळगाव,२०२६ :
बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी बेनकनहल्ली बेळगाव येथील माध्यमिक हिंदी विषय शिक्षिका शिवांगी राहुल  मोदगेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट समर्पण आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल ‘बेला टिचर्स अवॉर्ड – आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अनेक अर्जांमधून शिवांगी राहुल मोदगेकर यांची त्यांच्या शैक्षणिक कार्याची, समर्पणाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन निवड करण्यात आली.

     प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते श्री. सुदेश बेरी यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित ‘आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, संस्कार आणि विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी  शिवांगी मोदगेकर

सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे असलेले समर्पण आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यामुळे त्यांची शैक्षणिक क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी तसेच सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा आजपासून*3 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन*बेळगावात भाजपची ‘सेवा ज्योती यात्रा’; पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेला उजाळा**बेळगाव उत्तर मतदारसंघात 24x7 पाणीपुरवठा योजनेला गती; आमदार राजू सेठ यांच्याकडून कामाची पाहणी**मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संदीप कामुले यांची निवड**निपाणीत रेशन तांदळाची अवैध वाहतूक उघड; दोन ट्रकसह 41.72 लाखांचा मुद्देमाल जप्त**बेळगाव ऊसदराचा प्रश्न : शेतकरी संघटनेची ₹६ हजार दराची मागणी**शिवांगी राहुल मोदगेकर यांना ‘बेला टिचर्स अवॉर्ड’ने सन्मानित**पुण्याच्या MPSC आंदोलनात घुमला सीमालढ्याचा जयघोष “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”च्या घोषणेने सीमावासीयांचे लक्ष वेधले**कुल्फी 'तर्फे घेण्यात आलेल्या 'लिहितं व्हा'स्पर्धेत सोमी पाटीलचे यश*