LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कुल्फी 'तर्फे घेण्यात आलेल्या 'लिहितं व्हा'स्पर्धेत सोमी पाटीलचे यश*

 

     येथील मराठी विद्यानिकेतन शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सोमी मारुती पाटील हिने कुल्फी अंकातर्फे घेण्यात आलेल्या 'लिहितं व्हा'-२०२६ या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये लेखन करण्यासाठी लेखन प्रकारांतर्गत काही विषय देण्यात आले होते. यामध्ये 182 मुलांनी आपलं लेखन पाठवलं, 32 जिल्हे व 82 शाळांतून लेखन सहभाग होता. यामध्ये सोमीने बेळगावमधून उल्लेखनीय यश संपादन केले. सातवीतील अद्वैत तनया वैभव जोशी,चिंतामणराव केळकर विद्यालय,चेंढरे

(अलिबाग),दहावीतील नम्रता रविकांत सिद्ध,महात्मा गांधी विद्यालय (आष्टा),सोमी मारुती पाटील-इयत्ता चौथी

मराठी विद्यानिकेतन, बेळगाव,पाचवीतील निवा महेश सोवनी,

दादासाहेब दांडेकर विद्यालय(भिवंडी),

सहावीतील आराध्य चैतन्य दांडेकर,जिल्हा परिषद शाळा गुडघे(रत्नागिरी),दहावीची विद्यार्थिनी भूमी पवार(सेक्रेड हार्ट स्कूल(कल्याण),सातवीतील

सोनाक्षी शिंदे(पद्माराजे गर्ल्स हायस्कूल-कोल्हापूर),

7वीतील रितू वृंदा गणेश हंजगे(वि स खांडेकर प्रशाला-कोल्हापूर) हे या स्पर्धेतील विजेते आहेत.येत्या शैक्षणिक वर्षात या विजेत्यांची एक अनुभवशाळा पुण्यात संपन्न होणार आहे यात चांगलं लेखन करणाऱ्या मुलांना जगभरातल्या बालसाहित्याचा, चित्रांचा इतर काही कलाकृतींचा अनुभव देण्याचा प्रयत्न असेल. शिवाय माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर या मुलांना मार्गदर्शन करतील, जेणेकरून आणखी चांगलं लेखन करायला सुयोग्य दिशा मिळू शकेल.

   सोमीला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, स्पर्धा विभाग प्रमुख मुक्ता आलगोंडी,शाहीन शेख,पालक यांचे मार्गदर्शन मिळाले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*कुल्फी 'तर्फे घेण्यात आलेल्या 'लिहितं व्हा'स्पर्धेत सोमी पाटीलचे यश**शिक्षण, आरोग्यासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : लक्ष्मी हेब्बाळकर*मिरजच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी*राज्यस्तरीय अॅथलेटिक्समध्ये मधुरी गजानन पाटीलची चमकदार कामगिरी**१४ वर्षीय सुषांतची उपचारासाठी झुंज; कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीचे आवाहन GBS आजारामुळे हात-पायांवर परिणाम; बेळगावातील रुग्णालयात उपचार सुरू, २ ते ३ लाख रुपयांच्या खर्चाची गरज**बेळगाव शहर विकासाला गती देण्यासाठी बुडाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा**Skyworld Aviation Academyच्या विद्यार्थ्यांची हैदराबाद विमानतळावर निवड! बेळगावात सत्कार सोहळा; माजी आ संजय पाटील, नागराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती**अपघात प्रकरणात टेम्पो चालकासह मालकाची निर्दोष मुक्तता झाडशहापूर दर्ग्याजवळ मोटरसायकलला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूचा आरोप; साक्षीदारांच्या विसंगतीचा आरोपींना लाभ*कंग्राळी बी.के.मध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ट्रान्सफॉर्मरजवळ कचरा जाळल्याने ग्रामस्थ चिंतेत*कर्मचाऱ्यांच्या विम्यावर GST क्रेडिटचा मार्ग मोकळा होणार? 7 ऑक्टोबरच्या GST कौन्सिल बैठकीत प्रस्तावावर होणार चर्चा; कंपन्यांचा विमा खर्च कमी होण्याची शक्यता*