Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*बेळगाव CCB ची धडक कारवाई; 24.80 ग्रॅम हेरॉईनसह दोघे जाळ्यात*

बेळगाव शहरातील एपीएमसी फळबाजार परिसरात अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेने (CCB) धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 24.80 ग्रॅम हेरॉईन, एक मोबाईल फोन आणि मिळून 5 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात महादेव गजानन पाटील (वय 28, कंग्राळी के.एच.) आणि विनायक बाळू खंडाळे (वय 25, कंग्राळी के.एच.) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एपीएमसी फळबाजारातील सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची वाहतूक करत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 4 लाख 96 हजार रुपयांचे 24.80 ग्रॅम हेरॉईन तसेच 5 हजार रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल जप्त केला आहे.

प्राथमिक तपासात आरोपींना मुंबईतील 'अम्मा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका महिलेने हेरॉईनचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यातील कलम 8(C) व 21(B) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई CCB चे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*