Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पद्मश्री सन्मानाबद्दल अनिल बेनके यांचे अभिनंदन

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पद्मश्री सन्मानाबद्दल अनिल बेनके यांचे अभिनंदन

बेळगाव : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर माजी आमदार अनिल बेनके यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले.
यावेळी अनिल बेनके यांनी डॉ. कोरे यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करत, हा गौरव त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ सेवाभावाचा तसेच शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा योग्य सन्मान असल्याचे नमूद केले.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी अनेक दशकांपासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उभारलेल्या संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना लाभ झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
भेटीदरम्यान त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, समाजहितासाठी त्यांचे प्रेरणादायी कार्य यापुढेही अशाच जोमाने सुरू राहो, अशी अपेक्षा अनिल बेनके यांनी व्यक्त केली.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव वनक्षेत्र आणि धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई**देवगिरी गावात दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा**डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पद्मश्री सन्मानाबद्दल अनिल बेनके यांचे अभिनंदन**संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश*संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश.देवगिरी गावात दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार अधिक चांगल्या सुविधाबेळगाव वनक्षेत्र आणि धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाईडॉ. प्रभाकर कोरे यांच्या पद्मश्री सन्मानाबद्दल अनिल बेनके यांचे अभिनंदन*बेळगावात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा सेवाभावी उपक्रम; श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*