LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून सेवाभावी कर्मचाऱ्यांचा गौरव*

समाजासाठी अत्यंत कठीण आणि भावनिक परिस्थितीतही अखंडपणे सेवा बजावणाऱ्या स्मशानभूमी कर्मचारी, शववाहिका कर्मचारी तसेच पोस्टमॉर्टेम विभागातील कर्मचाऱ्यांचा बेळगावमध्ये विशेष सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रम, चंदन कमल केअर सेंटर आणि विकी मेहता यांच्या संयुक्त पुढाकारातून, माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कृतज्ञता सोहळा पार पडला.

पाई रिसॉर्ट येथे आयोजित कार्यक्रमात समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंच्या भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या निःस्वार्थ सेवेला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला डॉ. माधव प्रभू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. जी. गडद, बेळगाव महानगरपालिकेचे उपआयुक्त उदयकुमार तलवार, दिनेश वर्नेकर, श्रीपाद पाई आणि विजय कोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी या कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी स्मशानभूमी, शववाहिका आणि पोस्टमॉर्टेम विभागातील कर्मचारी हे समाजातील खऱ्या अर्थाने पडद्यामागील योद्धे असल्याचे सांगितले. कोणतीही परिस्थिती असो, हे कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यामुळे त्यांना समाजाकडून सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्कार समारंभानंतर सर्व सन्मानित कर्मचारी आणि उपस्थित पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला अ‍ॅलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद होळी, गंगाधर पाटील, मायकेल पिंटो, सूरज गावळी यांच्यासह अनेक स्वयंसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*