खानापूर : आज सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खानापूर आणि कित्तूर मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्याचे आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले. या भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व उन्नतीकरणाच्या कामांचा आढावा घेताना मंत्री महोदयांनी “स्थानिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीची सोय उपलब्ध होण्यासाठी रस्ते विकास ही प्राथमिकता असली पाहिजे,” असे स्पष्ट केले.
खास करून एम. के. हूबळी ते परिषवाड, परिषवाड ते खानापूर बिडी क्रॉस आणि लिंगणमट ते कित्तूर मार्ग या रस्त्यांचे उन्नतीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मार्गांवरील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन लवकरच दर्जेदार दुरुस्तीचे काम सुरू करण्याची तयारी विभागाकडून सुरू असल्याचे समजते.
https://youtube.com/shorts/X_4wI3kAX58?si=ycidJXeXLTRF7x7M
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत “या रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल” अशी भावना व्यक्त केली आहे.
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.