LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Sports News

*CBSE राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या आर्या कदमची सुवर्ण कामगिरी*

*रिंक रेसमध्ये दक्षिण विभागाची आघाडी; विविध गटांत स्केटर्सची पदकांची लयलूट*

बेळगाव | प्रतिनिधी

बेळगावमध्ये सुरू असलेल्या CBSE राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत स्थानिक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. रिंक रेसच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण विभागातील स्केटर्सनी आघाडी घेतली असून, बेळगावच्या आर्या कदमने सुवर्णपदक पटकावत लक्षवेधी कामगिरी केली.

बेळगावातील बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रिंक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी देशभरातून सहभागी झालेल्या स्केटर्समध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. विविध वयोगटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. यामध्ये आर्या कदमने सुवर्णपदक मिळवत बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

पदक विजेत्यांचा गौरव

स्पर्धेच्या विविध गटांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची कामगिरी पुढीलप्रमाणे राहिली—

- मोरया नाईक – सुवर्ण
- डोरे श्रीयान – रौप्य
- शौर्यवर्धन राजपूत – कांस्य
- सेलिना मॅडिसन – सुवर्ण
- वाणी जिंदाल – रौप्य
- आकृती शेट्टी – कांस्य
- आलीत जेम्स – सुवर्ण
- अद्विक चौधरी – रौप्य
- विनायक व्ही. – कांस्य
- धनशिका के. एस. – सुवर्ण
- आर्याध्या सिंग – रौप्य
- लूशा महेश्वरी – कांस्य
- आर्या कदम – सुवर्ण
- जतिन केशवानी – रौप्य
- ईश्वर – कांस्य
- साधना एम. – सुवर्ण
- कायरा सिंग – रौप्य
- पी. एम. रक्षिता – कांस्य
- दक्ष भाटी – सुवर्ण
- सौरभ साळोखे – रौप्य
- अंशुमन बघेल – कांस्य
- जेसीना कोरेरा – सुवर्ण
- जानूशिया एम. – रौप्य
- एस. सुधाक्षीना – कांस्य
- शब्रीवसन पी. बी. – सुवर्ण
- आयुष भट्टा – रौप्य
- सिद्धार्थ खारोल – कांस्य
- निहारिका टी. – सुवर्ण
- काशिका एस. – रौप्य
- अमरीथा पी. – कांस्य

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ ज्योती चिंडक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. प्रेमानंद जाधव, रवीश राव, आलोक त्रिपाठी, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह स्पर्धक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम

राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर तसेच बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व कर्मचारी आणि इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेचे बेळगावमध्ये आयोजन झाल्याने शहरातील क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळत असून, युवा स्केटर्सना मोठ्या व्यासपीठावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावात मटका अड्ड्यावर मार्केट पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, 1,210 रुपये जप्त**दुष्काळग्रस्त यादीत गडहिंग्लजचा समावेश होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकजुटीने आंदोलन!**ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर; रिफ्लेक्टर-इंडिकेटर बंधनकारक**मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन; वयाच्या ९१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास**दक्षिण पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; ग्रुप बुकिंगचे नियम झाले सोपे**सहकार रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दिगंबर एस. पवार यांचा चव्हाट गल्लीतर्फे भव्य नागरी सत्कार**कियाने कारच्या व्हेरिएंट लाइनअपमध्ये मोठे बदल; सेल्टोस, सोनेट आणि कॅरेन्स क्लॅव्हिसचे अनेक व्हेरिएंट बंद**बासवण्णांचा अवमान केल्याचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी**‘शरण परंपरेचा अवमान खपवून घेणार नाही’; ‘बसव मंटप’ पुस्तकाच्या लेखकावर कारवाईची जगदीश शेट्टर यांची मागणी**ಶರಣ ಪರಂಪರೆಯ ಅವಹೇಳನ ಖಂಡನೀಯ ಬಸವ ಮಂಟಪ ಕೃತಿಯ ಲೇಖಕರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನು ಕ್ರಮಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಜಗದೀಶ ಶೆಟ್ಟರ್‌ ಆಗ್ರಹ*