LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल

बेळगाव : शहरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी चार ते पाच इंचांपर्यंत खोल खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांचा धोका वाढला असून अनेक वाहनांचे नुकसानही होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
शहरात हजारो खड्डे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, पावसाळ्यामुळे ही समस्या आणखी तीव्र झाली आहे. विशेषतः रामदेव गल्लीसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विशाल देशपांडे यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित केला आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे कारवाई केली जाते, मात्र हेच कॅमेरे रस्त्यांवरील धोकादायक खड्डे प्रशासनाच्या नजरेस का आणत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*