समन्वय मंत्र्यांनी येथे आले पाहिजे आणि इथल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे असे मत महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.बेळगावात एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सीमा बांधवांनी कधीही हिंसक मार्गाने आंदोलन केलेले नाही.सीमाप्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. सीमाप्रश्नाची महाराष्ट्र सरकारने ज्यांना जबाबदारी दिली आहे. त्यांना मी सर्वोच्च न्यायालयात तारखा लवकर घेण्यासाठी विनंती करेन असे आश्वासन देखील जयंत पाटील यांनी दिले.
Also read









