LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

८ हजार क्यूसेक पाण्याची आवक; सतीश जारकीहोळींची जलाशय पाहणी

बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीच्या खोऱ्यातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी सकाळी घटप्रभा परिसरातील धुपदाळ जलाशयाची पाहणी करून जलसाठा, पाण्याची आवक आणि व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली चिंता आता कमी होत असून, जलाशयात सध्या सुमारे ८ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धुपदाळ जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून अतिरिक्त पाणी घटप्रभा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
या विसर्गामुळे बेळगाव ते बागलकोट दरम्यान नदीचा प्रवाह सुधारला असून बागलकोट जिल्ह्यापर्यंत पाणी पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून रविवारी सकाळपासून घटप्रभा डाव्या कालव्यात १,००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत हा विसर्ग २,००० क्यूसेक करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
पुढील काळात पावसाचे स्वरूप कसे राहील याबाबत निश्चित अंदाज देता येत नसल्याने उपलब्ध पाण्याचा जपून आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जलाशयातील पाण्याची पातळी आणि आवक यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*