LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

बेळगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; दहावीनंतरच्या करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बेळगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; दहावीनंतरच्या करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बेळगाव :
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने (कै. आशीर्वाद रमेश सावंत यांच्या स्मरणार्थ) दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सीमा लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्त्या म्हणून वकील व प्राध्यापक सरिता सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेताना आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे. तसेच स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देऊन भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. सरिता पाटील यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूरचे अध्यक्ष गोपाल देसाई, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस यूनिस मालोजीराव अष्टेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अंकुश केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*