LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सला नवे नेतृत्व; अध्यक्षपदी स्वप्निल शाह

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सला नवे नेतृत्व; अध्यक्षपदी स्वप्निल शाह

बेळगाव : बेळगावच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BCCI) ने 2026-27 या कार्यकाळासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्निल शाह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, नव्या कार्यकारिणीकडे आगामी काळात उद्योग-व्यापार क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारी समितीच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीला निवृत्त अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी आणि निवृत्त मानद सचिव सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत उदय जोशी यांची वरिष्ठ उपाध्यक्ष, राजेंद्र मुतगेकर यांची द्वितीय उपाध्यक्ष, मनोजकुमार एन. मत्तिकोप्पा यांची मानद सचिव, विनीत हरकुणी यांची संयुक्त मानद सचिव आणि रमेश लड्डड यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.
याशिवाय व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील आजीव, पालक तसेच वार्षिक सदस्यांचा समावेश असलेली नवीन कार्यकारी समितीही जाहीर करण्यात आली. उद्योग आणि व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे, सदस्यांना अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि व्यापारी हिताचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे हे नव्या कार्यकारिणीसमोरील प्रमुख उद्दिष्ट असेल.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या 2025-26 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार मानत नव्या टीमला शुभेच्छा दिल्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*