ज्ञान, संस्कार आणि गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारी गुरुपौर्णिमा स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर गुरुजनांच्या उपस्थितीत केक कापून गुरुपौर्णिमेचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, अभिनय आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामने, ज्योती बामने, मॅनेजर फैजल परेल, पूजा चार्ल्स, ऐश्वर्या बागेवाडी आणि किरण तोंडले यांचा विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे आशीर्वाद घेत त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून गुरुंच्या ज्ञानदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आदर आणि कृतज्ञतेची भावना दृढ करण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
