LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*यश संजय मोरे यांनी मिळविली बी.टेक. पदवी; सेमीकंडक्टर क्षेत्रात यशाची भरारी*

बेळगाव येथील यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांचे चिरंजीव यश संजय मोरे यांनी पीईएस युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेची बी.टेक. पदवी यशस्वीरित्या संपादन करत सेमीकंडक्टर (Semiconductor) या अत्याधुनिक क्षेत्रातील स्पेशलायझेशन पूर्ण करून उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळविले आहे. त्यांचा पदवीदान (दीक्षांत) समारंभ दि. २६ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

मूळचे राकसकोप गावचे असलेले आणि सध्या लक्ष्मीनगर, बेळगाव येथे वास्तव्यास असलेले यश मोरे यांनी आपले माध्यमिक शिक्षण सेंट पॉल हायस्कूल, बेळगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर अल्वास पीयू कॉलेज, मुडबिद्री (मंगळूर) येथे बारावीचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षणाच्या तयारीसाठी त्यांनी राजस्थानातील कोटा येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर पीईएस युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथे अभियांत्रिकी शिक्षणास प्रवेश मिळविला.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील बी.टेक. पदवीसह सेमीकंडक्टर क्षेत्रातील स्पेशलायझेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स आणि आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या युगात सेमीकंडक्टर क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त होत असताना, यश मोरे यांचे हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

यश मोरे यांच्या गुणवत्तेची दखल घेत कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमधून त्यांची इन मोबी (InMobi) या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड झाली आहे. सध्या ते कंपनीत इंटर्नशिप (Internship) पूर्ण करत असून, त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह राकसकोप व बेळगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

यश मोरे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व व्यावसायिक यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतील शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*