LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*गुरु पौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

 बेळगाव तारीख 30 अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदजी, डॉ जयतीर्थ कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तदार व्यासपीठावर उपस्थित होते . प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ओंकार सरस्वती भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी गुरु स्तोत्रचे पठण केले याप्रसंगी शाळेचे विद्यार्थीनी संभवी स्वामी, मानवी चिंचवडकर, यांनी गुरुचे महत्व सांगितले तर श्राव्या भट्ट हिने गीत गायले, यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 2026 दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूर्वी शेट्टी, श्रावणी मोरे,भक्ती कुंभार, सहना सोलंकर,मनाली जुवेकर,सायना मजुकर आकांक्षाबोकम्मुरकर, स्नेहा धनवडे, वर्षा परीट,सर्वेश तेवरे श्रावणी मेरवा.

 या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आठवी व नववी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र चषक देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी 2025 26 सालाच्या आदर्श शिक्षिका म्हणून शामल दड्डीकर, व माया निलजकर यांचा गौरव करण्यात आला तसेच शाळेच्या शिपाई सुरेखा शहापूरकर ज्योती अनिगोळ  यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाळा सुधारणा समिती सदस्य रजनी गुर्जर, माधव पुणेकर,किशोर काकडे, नीता अनगोळकर, मयूर कुलकर्णी, संतोष देशपांडे, उपमुख्याध्यापिका  ऋतुजा जाधव  व शिक्षक वर्ग उपस्थित होता 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर सविता पाटणकर रूपाली जोशी तर सुजाता पाटील यांनी आभार मानले शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*