विजांच्या कडकडाटासह काही काळ मुसळधार सरी कोसळल्याने शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. रस्त्यावर असलेल्या वाहनचालकांना अचानक आलेल्या पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागला.
अनेक नागरिकांनी आसरा शोधण्यासाठी धावपळ केल्याचे चित्र दिसून आले, तर काही भागांत वाहतूक मंदावली.
बेळगाव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत या अवकाळी पावसाचा परिणाम जाणवला. वादळी वाऱ्यांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या संभाव्य नुकसानीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
Also read









