उसाला साडे तीन हजार रु प्रती टन भाव द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले असून अनेक संघटनानी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे बंगलोर महामार्गांवर काही शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली.या आंदोलनात भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष बी. वाय. राघवेंद्र यांनी पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उसाला साडे तीन हजार भाव जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करायची नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. अर्धनग्न अवस्थेतील आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच्या नावे शंखनाद करून निषेध केला. आपल्या खांद्यावरील हिरवे टॉवेल हवेत फिरवून शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक शेतकऱ्यांच्या साठी महिलांनी जेवणाची व्यवस्था केली.
Also read









