LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात शेतकरी हुतात्मा दिन; ऊस कांड्यांच्या पूजनातून शहीदांना अभिवादन*

कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेनेच्या वतीने मंगळवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकरी हुतात्मा दिन श्रद्धापूर्वक पाळण्यात आला. यावेळी ऊस कांड्यांचे पूजन करून शेतकरी आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी शेतकरी चळवळीचा इतिहास आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित लढा हाच प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी नरगुंद आणि नवलगुंद येथील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत, तत्कालीन सरकारच्या काळात झालेल्या पोलिस गोळीबारात दोन शेतकरी सत्याग्रहींना प्राण गमवावे लागले होते, ही घटना शेतकरी चळवळीच्या इतिहासातील वेदनादायी अध्याय असल्याचे सांगितले. आजही शेतकऱ्यांना विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करत शेतकरी हिताच्या प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*