LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*आषाढी वारीत बेळगावच्या ‘वन टच फाऊंडेशन’ची सेवाभावी पुढाकार*

 आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकरी माऊलींच्या सेवेसाठी बेळगावच्या वन टच फाऊंडेशनने राबविलेला सेवाभावी उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. "एक हात मदतीचा, समाजसेवेचा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना पाणी, केळी, शीतपेये आणि बिस्किटांचे वाटप केले.

या उपक्रमासाठी हॉटेल विराटचे मालक व समाजसेवक कपिल भोसले यांनी 20 बॉक्स पाण्याच्या बाटल्या, विनायक कांगले यांनी 1,000 केळी व शीतपेये, नगरसेवक राजू भातकांडे, सूर्यकांत हेब्बाळकर, Extreme Security Solutionचे प्रमुख इंद्रजित प्रधान यांनी 250 लिंबू शीतपेय पाकिटे, तर फेसबुक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष व समाजसेवक संतोष दरेकर यांनी दोन बॉक्स बिस्किटे देऊन सहकार्य केले.

वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष, समाजसेवक व कलाकार विठ्ठल फोंडू पाटील यांनी स्वतःचे चारचाकी वाहन उपलब्ध करून देत या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत फाऊंडेशनचे सदस्य नारायण कांगले, राजू मनगुतकर आणि रवींद्र पाटील यांनीही वारकऱ्यांची सेवा केली.

बेळगावपासून सुमारे २५ किलोमीटरपर्यंत निलजी गावाच्या दिंडीत सहभागी होत कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तन आणि विठ्ठलनामाचा जयघोष करत पायी प्रवास केला. वाटेत ज्या-ज्या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिंड्या भेटल्या, तेथे "राम कृष्ण हरी... माऊली... माऊली..." असा गजर करत आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सेवेचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भावनिक वातावरणात कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचा निरोप घेतला. वारकरी माऊलींनी या निस्वार्थ सेवेसाठी सर्व दात्यांचे आणि वन टच फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*