LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश आणि कुलदीपची चमकदार कामगिरी*

बेळगाव : पाँडिचेरी येथे आयोजित केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली. सर्वेश रुपेश पाटील आणि कुलदीप बिर्जे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण 3 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावले.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून 500 हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

सर्वेश रुपेश पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्णपदके मिळवली. तर कुलदीप बिर्जे याने 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावत यश संपादन केले.

दोन्ही खेळाडू स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत.

या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम तसेच दोन्ही खेळाडूंच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले आहे.

राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे सर्वेश आणि कुलदीप यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*SIR वर विनाकारण राजकारण नको; मृगेंद्र गौडा पाटील यांचा काँग्रेसला सल्ला**बेळगावचे गणेश विसर्जन ४२ तासांवर; सामाजिक कार्यकर्ते सुजित मुलगुंद यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न**बैलहोंगलमध्ये महिलेची दगडाने ठेचून हत्या; झुडपात आढळला मृतदेह**कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा कार्यकारिणीचा आज पदग्रहण सोहळा**पीरजी शांतिनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजपूत समाजाचा श्रद्धांजली कार्यक्रम**वंटमुरी कॉलनी, बसवण कुडची येथे दोन नवीन अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाला सुरुवात**विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा संघ रवाना**गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महामंडळाकडून आभार**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश आणि कुलदीपची चमकदार कामगिरी**श्रीनगरमध्ये १ किमी रस्ता आणि गटार कामांना सुरुवात; आमदार राजू सेठ यांचा पुढाकार*