LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*पीरजी शांतिनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजपूत समाजाचा श्रद्धांजली कार्यक्रम*

बेळगाव : परमपूज्य श्री श्री १००८ पीरजी श्री शांतिनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगाव शहरातील रूपाली टॉकीज हॉल येथे राजपूत समाजाच्या वतीने पूजा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी समाजबांधवांनी पीरजी शांतिनाथजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी “प्रणमुं म्हारा पीरजी, नमो नमो नव नाथ। जय जय शांतिनाथजी, सिर पर धरजो हाथ॥” या भक्तिमय जयघोषातून पीरजी महाराजांना वंदन करण्यात आले.

मृगेंद्र गौडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमासाठी भाजप नेते मृगेंद्र गौडा पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पूजा व श्रद्धांजली कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी राजपूत समाजाच्या वतीने तसेच समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून मृगेंद्र गौडा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान समाजातील मान्यवरांनी पीरजी शांतिनाथजी महाराज यांच्या कार्याचे आणि स्मृतींचे स्मरण केले. समाजातील एकजूट, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाला राजपूत समाजातील प्रमुख पदाधिकारी, समाजबांधव आणि नागरिक उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*SIR वर विनाकारण राजकारण नको; मृगेंद्र गौडा पाटील यांचा काँग्रेसला सल्ला**बेळगावचे गणेश विसर्जन ४२ तासांवर; सामाजिक कार्यकर्ते सुजित मुलगुंद यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न**बैलहोंगलमध्ये महिलेची दगडाने ठेचून हत्या; झुडपात आढळला मृतदेह**कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा कार्यकारिणीचा आज पदग्रहण सोहळा**पीरजी शांतिनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजपूत समाजाचा श्रद्धांजली कार्यक्रम**वंटमुरी कॉलनी, बसवण कुडची येथे दोन नवीन अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाला सुरुवात**विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा संघ रवाना**गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महामंडळाकडून आभार**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश आणि कुलदीपची चमकदार कामगिरी**श्रीनगरमध्ये १ किमी रस्ता आणि गटार कामांना सुरुवात; आमदार राजू सेठ यांचा पुढाकार*