LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा कार्यकारिणीचा आज पदग्रहण सोहळा*

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा कार्यकारणीची आज (बुधवार दि.३०)बेळगाव येथील जी.जी.चिटणीस हायस्कूलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असून यावेळी नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात म्हणूजे शनिवार दि.२६ रोजी बालिका आदर्श विद्यालयात संघाचे राज्य उपाध्यक्ष चिदानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती.यावेळी सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती.त्यानुसार बुधवार दि.३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक साडेचार वाजता बेळगाव येथील जी.जी.चिटणीस स्कूल टिळकवाडी येथे होणाऱ्या पदग्रहण समारंभात जिल्हा कार्यकारिणीची नावे घोषित (जाहीर) करण्यात येणार असून यावेळी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ, उपाध्यक्ष चिदानंद पाटील, संघाचे राज्य सचिव आर.पी.वंटगुडी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या तीन चार वर्षापासून संघाचे जिल्हाध्यक्षपद रिकामेच होते.

तसेच इतर पदाधिकारी आपल्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्याने जिल्हा कार्यकारिणीची निवड करणे आवश्यक होते.त्यानुसार बेळगांव शहर, ग्रामीण व खानापूर तालुकायातील शिक्षकांच्यामधून जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. 

तरी शिक्षक संघाच्या सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मावळते जिल्हा कार्यदर्शी उमेश कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष आर.आर.कुडतुरकर, माजी खजिनदार एस.ए. कळ्ळेकर यांनी केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुंदा नगरी सज्ज* *बिर्ला शाळेच्या वतीने आयोजित** ज्योती सेंट्रल स्कूल ची अभिमानास्पद कामगिरी!गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचा बेळगावात सत्कार*देसूरच्या शाळेसाठी 5 एकर जमीन मिळवणार; ₹50 लाखांत ग्रंथालय उभारण्याची लक्ष्मी हेब्बाळकरांची घोषणा**बेळगावच्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेची’; अभय पाटलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर सतीश जारकीहोळींचा टोला**राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये समीक्षा कर्तस्करची दमदार कामगिरी; SGFI राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड**काकतीत थंडीमध्ये असहाय अवस्थेत आढळले आजोबा; समाजसेवकांच्या तत्परतेने जिल्हा रुग्णालयात दाखल बातमी**द. म. शीक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल च्या ध्यानेश संदीप बामणे याची बेळगाव च्या फुटबॉल जगतात उत्तुंग भरारी*🌟 नेतृत्व, सेवा आणि मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात! 🌟*बेळगावमध्ये 29 नोव्हेंबरला ‘हिंडाल्को नम्मा बेळगावी मॅरेथॉन’; 1000 धावपटूंचा सहभाग अपेक्षित*