शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आज बेळगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
कर्नाटकचे सार्वजनिक आरोग्य मंत्री शिवानंद पाटील यांच्या गाडीवर काही आंदोलनकर्त्यांनी चप्पल आणि पाण्याची बाटली फेकल्याचा प्रकार घडला आहे.
मंत्री पाटील हे शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर निघत असताना अचानक काही आंदोलकांनी रोष व्यक्त केला. घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.
माहितीनुसार, शेतकरी नेत्यांनी ऊसदर आणि थकबाकीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.
मंत्री पाटील यांनी चर्चेदरम्यान दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काही शेतकरी "तत्काळ निर्णय" घेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वातावरण तापले.
https://youtube.com/shorts/wiwRq2-lgbs?si=hVFM27nqTxgdu94C
या घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे.
या घटनेने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
Also read









