LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील 42 आरोपींची निर्दोष मुक्तता*

बेळगाव :
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणाला गुरुवारी महत्वाचा टप्पा गाठला. या प्रकरणातील 125/2015 क्रमांकाच्या गुन्ह्यातील सर्व 42 आरोपींना न्यायालयाने सबळ पुरावे व साक्षीदारांच्या विसंगतीच्या कारणास्तव निर्दोष मुक्त केले आहे.

या नामफलक प्रकरणात सुरुवातीला एकूण सात खटले दाखल झाले होते. त्यामध्ये 42 आरोपींवर गुन्हे नोंदवले गेले होते. यातील सात आरोपींना वगळण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 32 आरोपींवर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी तीन खटल्यांचा निकाल लागला असून चार खटले प्रलंबित होते. त्यापैकी आज एका खटल्याचा निकाल लागून सर्व आरोपींची मुक्तता झाली आहे.

आरोपींच्या वतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर व ॲड. श्याम पाटील यांनी कामकाज पाहिले. निकालानंतर बोलताना ॲड. श्यामसुंदर पत्तार म्हणाले,
"२७ मे २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा नामफलक हटवण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थांचा तीव्र संताप उसळून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. याच घटनेवरून २५० ते ३०० ग्रामस्थांवर पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले होते. त्यातील १२५/२०१५ या गुन्ह्यातील सर्व आरोपींना आज निर्दोष मुक्त करण्यात आले आहे."

त्यांनी पुढे सांगितले की, सातपैकी चार खटल्यांचा निकाल येळ्ळूरवासियांच्या बाजूने लागला असून, उर्वरित तीन खटल्यांमध्ये देखील ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*