कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी कलाप्पा पाटील यांची निवड
बेळगाव :तालुक्यातील कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड काल पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत अध्यक्षपदी दोडव्वा माळगी यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदाच्या चुरशी झालेल्या लढतीत कलाप्पा पाटील यांनी बाजी मारली.
ग्रामपंचायत एकूण 27 काल सकाळी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी राखीव होते. या पदासाठी दोडव्वा माळगी यांचा एकमेव अर्ज आला. यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी कलाप्पा पाटील व प्रशांत पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. कलाप्पा पाटील यांना 14 तर प्रशांत पाटील यांना 12 मते मिळाली तर 1 मत बाद ठरले .
यामध्ये कल्लाप्पा पाटील यांनी बाजी मारली.निकाल घोषित झाल्यावर समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. दरम्यान निवडणुकीसाठी मंत्री सतीश जारकीहोळी,मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली होती. त्यात त्यांना यश मिळाले निवडणूक अधिकारी म्हणून बी एस शिवलिंगप्पा ,पीडिओ विवेक गुरव, सेक्रेटरी राजकुमार संगवी यांनी काम पाहिले.
निवडणूक प्रक्रियेच्या वेळी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये डीसीपी शेखर एसीपी यांनी बरमणी, एसीपी मंजुना थेरेमठ, पीआय सुनील पाटील,मंजुनाथ बजंत्री यांच्या उपस्थितीत चोख पोलीस ठेवण्यात आला होता.