धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज्यांच्या मूर्ती उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार अभय पाटील यांच्याकडून खासदार श्री उदयनराजे भोसले यांना आमंत्रण….
धर्मवीर संभाजी चौक अनगोळ बेळगाव येथे भारतातील सर्वात उंच 20 फूट पंचधातूची मूर्ती उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी साताऱ्याचे खासदार, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज मा.उदयनराजे भोसले यांना आमंत्रित केले आहे. शनिवारी अभय पाटील यांनी जलमंदिर पॅलेस सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजवाड्याला भेट दिली,आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिले ,यावेळी मा. उदयनराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ह्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
हे निवेदन देण्यासाठी आमदार अभय पाटील
अनगोळ गावातील प्रतिष्ठित नागरिक
नगर सेवक मंगेश पवार गिरीश धोंगडी जितेंद्र देवन प्रशांत कंग्राळकर श्रीशैल कांबळे सारंग रागोचे जयंत जाधव संतोष जैनोजी प्रफुल सोमनाचे अनिल तुडयेकर परशराम तहसीलदार अरुण गावडे दीपक सोमनाचे प्रशांत धाकलुचे बस्सू पाटील पिंटू,जीवन जिंघरूचे भीमा दडगल प्रवीण पिलंकर देवदत्त पाटील व भा ज पा कार्यकर्ते उपस्थित होते