This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

*तेलाचे डबे चोरणाऱ्या दोघांना अटक*

*तेलाचे डबे चोरणाऱ्या दोघांना अटक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तेलाचे डबे चोरणाऱ्या दोघांना अटक

मंगळूर येथून तेलाचे डबे आणि बॉक्स भरून घेऊन जाणारा ट्रक बेळगाव व निपाणीला पोहोचविण्या आधीच ट्रक लुटून चोट्यांनी यामधील 30 लाख 38 हजार 276 रुपयांचे तेलाचे डबे लांबविण्याची घटना उघडकीस आली आहे.

सदर घटना बेळगाव जवळील हिरे बागेवाडी बडकोळमठ ट्रक मध्ये असलेले तेलाचे डबे आणि बॉक्स लांबविले होते.मात्र पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

इब्राहिम अली अब्दुल मजीद आणि साहेब अली हुसेन दोघेही राहणार आसाम अशी संशयित आरोपांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध सध्या हिरेबागेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या जवळून 30 लाख 38 हजार 276 रुपयांच्या तेलांच्या किमती पैकी 24 लाख 23 हजार रुपये किमतीचे खाद्य तेल पोलिसांनी जप्त केले आहेत.

या चोरट्याने ट्रक मधील 1465 तेलाचे डबे आणि 80 बॉक्स लांबविले होते. याप्रकरणी एसीपी बाळगवडा यांच्या मार्गदर्शनाखाली हिरे बागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबरीश वि व सहाय्यक मिळून चोरट्यांना अटक केली आहे.

त्यामुळे या सर्व पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24