दुचाकी वाहन घसरून नदीत पडल्याने पती आणि पत्नीचा घटप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.हुक्केरी तालुक्यातील नोगणीहाळ गावाजवळ असणाऱ्या घटप्रभा नदीवरील पुलावर ही घटना घडली.दुचाकीवरून नदीचा पूल ओलांडत असताना दुचाकी घसरून दुचाकीसह पती,पत्नी नदीत पडले.सुरेश बडीगेर (५३) आणि जयश्री बडीगेर (४५) अशी नदीत बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पुलाला संरक्षक कठडा नसल्याने पती,पत्नीला निष्कारण जीव गमावावा लागला.जयश्री हीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे.अग्निशामक दलाचे जवान बोटीतून सुरेश याच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.हुक्केरी पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे.