महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप
<span;>मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिंदे गटाने ज्यांचं कारण देऊन उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, आज तेच राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झालेत. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे या शपथविधीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
<span;>डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलंय – एकनाथ शिंदे
<span;>विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी साथ दिली आहे. त्यांनी विकासाचं राजकारण केलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला त्यांनी साथ दिली आहे. कर्तृत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जातं तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडत असतात, हे आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे.
<span;>अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, दादांसोबत कोणी कोणी शपथ घेतली?
<span;>या डबल इंजिनच्या सरकारला आथा ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास हा बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. या राज्याच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल. राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल.