LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक*


बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी बेळगाव शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील संवेदनशील भागांमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि पोलिसांनी पथसंचलन केले.

न्यू गांधी नगर परिसरात करण्यात आलेल्या या पथसंचलनातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा या रूट मार्चचा प्रमुख उद्देश होता.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या काळात विविध भागांतून मिरवणुका निघणार असल्याने पोलिसांकडून संवेदनशील परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच मिरवणूक मार्गांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे, या उद्देशाने RAF आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले.

गणेशोत्सव हा शांतता, सौहार्द आणि बंधुभावाचा सण असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच मिरवणुका आणि विसर्जन शांततेत पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष**गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचा ३० जणांचा चमू सज्ज! यश ॲटो येथे शुभेच्छा कार्यक्रम; रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबरला रवाना**यल्लम्मा देवीच्या डोंगरावर दुकानांवर धाडी; औषधांची विक्री आणि निकृष्ट खाद्यपदार्थ उघड**सारथी नगर, पोलीस कॉलनीत ₹1.25 कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात; लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांना यश**शाहूनगरात विघ्नहर्ताच्या महाआरतीचा सोहळा; संदेश राजमाने यांचा मंडळाकडून सन्मान*देवस्थान संस्कृतीने जगाला आकर्षित केलेले भव्य राष्ट्र भारत : मनोहरजी मठदकर्नाटकातील विद्यार्थ्यांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू*गणेशोत्सव शांततेत साजरा करा; व्यापाऱ्यांना सकाळपर्यंत व्यवसायाची मुभा —आ अभय पाटील**सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेऊन त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्यभर जनस्पंदन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत*